कन्नड लेखक कलबुर्गी यांच्या हत्येनंतर साहित्य अकादमीमध्ये पुरस्कार परत करण्याची रांगच लागली आहे. केरळमधील ज्येष्ठ लेखिका सारा जोसेफ यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला आहे. याशिवाय मल्याळम आणि इंग्रजी लेखक के.सच्चिदानंदन यांनी अकादमीचा राजीनामा दिला आहे.
नयनतारा, अशोक वाजपेयी, उदय प्रकाश या लेखकांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला. त्यानंतर एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येच्या विरोधात साहित्य अकादमीने मौन बाळगल्याचा निषेध व्यक्त करून अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य साहित्यिक श्रीमती शशी देशपांडे यांनी राजीनामा दिला आहे. देशातील सध्याची स्थिती अत्यंत भीतीदायक असल्याने, अशा गंभीर मुद्द्यावर स्वस्थ बसणे योग्य ठरणार नसल्याने आपण पुरस्कार परत करून निषेध नोंदवत असल्याची प्रतिक्रिया सारो जोसेफ यांनी माध्यमांना दिली.
दरम्यान, लेखकांनी आपला निषेध व्यक्त करण्यासाठी भिन्न मार्ग अनुसरावा, स्वायत्त संस्थेचे राजकियीकरण करू नये, असे मत अकादमीचे अध्यक्ष तिवारी यांनी अलीकडेच व्यक्त केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2015 रोजी प्रकाशित
सारा जोसेफ यांनी परत केला साहित्य अकादमी पुरस्कार
केरळमधील ज्येष्ठ लेखिका सारा जोसेफ यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 10-10-2015 at 13:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala writer sarah joseph to return sahitya akademi award