Khalistani outfit SFJ threatens to siege Indian consulate in Canada : खलिस्तानी संघटना शिख्स फॉर जस्टिस या संघटनेने बुधवारी कॅनडाच्या व्हँकुव्हर येथील भारतीय वाणिज्य दूतावासाला १८ सप्टेंबर रोजी घेराव घालण्याची धकमी दिली आहे. इतकेच नाही तर भारतीय-कॅनेडियन नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी गुरूवारी वाणिज्य दुतावासापासून दूर राहवे असे आवाहन देखील केले आहे.

अमेरिकेतली खालिस्तानी संघटना एसएफजेने एक नोटीस जारी करत कॅनडा येथील भारतीय वानिज्य दूतावासाला धमकी दिली आहे. तसेच खलिस्तान समर्थकांना लक्ष्य करण्यासाठी देशात गुप्तहेरांचे जाळे चालवत असल्याचा आरोपीही करम्यात आले आहे. “दोन वर्षांपूर्वी – १८ सप्टेंबर २०२३- पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत सांगितले होते की हरदीप सिंग निज्जर हत्येमध्ये भारतीय एजंट्सच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे. दोन वर्षे झाले तरी, भारतीय वाणिज्य दूतावास खलिस्तान रेफ्रेंडम मोहिम प्रचारकांना लक्ष करत पाळत ठेवणे आणि गुप्तहेरांचे नेटवर्क चालवत आहे,” असे एसएफजेने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

भारतात २०१९ रोजी बंदी घालण्यात आलेल्या शिख्स फॉर जस्टिस या संघटनेने एक पोस्टर देखील जारी केले आहे, ज्यामध्ये भारतीय उच्चायुक्त दिनेश पटनाईक यांच्या चेहऱ्यावर टार्गेट लिहिलेले असून याला ‘कॅनडामधील भारताच्या हिंदूत्व दहशतवादाचा नवीन चेहरा’ असे शीर्षक देण्यात आले आहे.

“खलिस्तान समर्थक शिख्स – शहीद निज्जर यांचे टॉर्चबेअरर – कॅनेडियन भूमिवर भारत सराकरकडून केली जाणारी हेरगिरी आणि धमकावणे याची जबाबदारी स्वीकारण्याच्या मागणीसाठी वानिज्य दूतावासाला ऐतिहासिक वेढा देतील,” असे नोटीसीमध्ये म्हटले आहे.

या नोटीसनुसार, या खलिस्तानी संघटनेने स्थानिक वेळेनुसार सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत भारतीय वाणिज्य दूतावासाला १२ तासांचा घेराव घालण्याची घोषणा केली आहे. या संघटनेने असेही म्हटले आहे की, भारतीय गुप्तहेरांकडून टाकलेल्या दबावानंतर, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी इंद्रजीत गोसाल या एका खलिस्तानी नेत्याला ‘विटनेस प्रेटेक्शन’ देऊ केले आहे.