राजदचा माजी खासदार महंमद शहाबुद्दीन व इतर तीन आरोपींना आज विशेष न्यायालयाने बिहारमधील सिवान येथे दोन भावांचा अकरा वर्षांपूर्वी खून केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. शिक्षा ११ डिसेंबरला सुनावली जाणार आहे. फिर्यादी पक्षाच्या मते चंद्रशेखर प्रसाद यांच्या तीन मुलांना गोशाळा रोड येथील घरातून १६ ऑगस्ट २००४ रोजी पळवून नेले. त्यात राजकुमार साह, शेख अस्लम व अरिफ हुसेन सामील होते.अपहरण केलेल्या मुलांना प्रतापपूर खेडय़ात नेण्यात आले. तेथे गिरीश व सतीश यांच्यावर अ‍ॅसिड ओतून त्यांना ठार करण्यात आले. तिसरा मुलगा राजीव रौशन कसाबसा सुटून परत आला. दोन भावांचे मृतदेह सापडले नाहीत. मुलांची आई कलावती हिने शहाबुद्दीनने पाठवलेल्या तीन मारेक ऱ्यांविरोधात फिर्याद दिली होती. चौकशीत शहाबुद्दीन याचे नाव सामोरे आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khuna prakara%e1%b9%87i sahabuddina do%e1%b9%a3i murder case shahabuddin convicted
First published on: 10-12-2015 at 04:02 IST