कुमारवयीन वयात ज्या मुला-मुलींना प्रियकर-प्रेयसी नसतात त्यांचे मानसिक आरोग्य अधिक चांगले असते एका संशोधनामधून सिद्ध झाले आहे. ‘कुमार वयात जी मुलं-मुली प्रेमात असता त्यांच्याहून प्रेमात न पडणारी तरुण मंडळी मानसिक दृष्ट्या अधिक कणखर असतात. तसेच ते अभ्यासातही पुढे असतात,’ असं या संशोधनामध्ये नमूद करण्यात आले आहे. ‘डेली मेल’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार जॉर्जिया विद्यापिठामध्ये प्रेमात पडणाऱ्या आणि न पडणाऱ्या कुमारवयीन मुलांनावर त्याचा कसा परिणाम होतो यासंदर्भात अभ्यास करण्यात आला आहे.
या संशोधनामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनाही सहभाग घेतला होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीला दिलेले गुण आणि विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेले प्रश्न यांचा एकत्र ताळमेळ घालून अंतिम निष्कर्ष काढण्यात आला आहे. या संशोधनाच्या अहवालामध्ये शालेय वयामध्ये मुलांनी जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करु नये अशी शिकवण किंवा सल्ला त्यांना द्यायला हवा. असं केल्यास त्यांची मानसिक वाढ अधिक चांगल्या पद्धतीने होते.
या संशोधनामध्ये सहावी ते १२ वी इयत्तेमधील ६०० विद्यार्थी सहभागी झाले. जी मुले रिलेशनशिपमध्ये नव्हती त्यांना मानसिक त्रासची समस्या जाणवत नव्हती. त्यांच्यामध्ये तणावाचे प्रमाण अगदीच कमी होते. रिलेशनमध्ये नसणाऱ्या मुलांची कौशल्ये ही रिलेशनमध्ये असणाऱ्यापेक्षा अधिक चांगली, प्रवाभी आणि परिणामकार होती असं या अभ्यासातून समोर आलं आहे. या संशोधनाचा अहवाल ‘जर्नल ऑफ स्कूल हेल्थ’ या नियतकालिकेत छापून आला आहे.
या प्रकल्पातील प्रमुख लेखक असणाऱ्या ब्रोकी डग्लस यांनी ‘शालेय जीवनामध्ये शिक्षण पद्धतीने, मानसिक आजारांसंदर्भातील तज्ज्ञ आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांची मानसिक प्रगती होईल अशा पद्धतीच्या व्यवस्थेवर भर दिला पाहिजे,’ असे मत व्यक्त केले आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर रिलेशनमध्ये रहावे की नाही किंवा त्याला/तिला डेट करावे अथवा नाही हा निर्णय पूर्णपणे मुलांवर सोडून द्यावा. त्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी तो त्यांच्या मानसिक स्वास्थासाठी चांगला असेल अशापद्धतीची व्यवस्था निर्माण होणे गरजेचे असल्याचे डग्लस म्हणाले.