नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची काल दुस-यांदा शपथ घेतल्यानंतर त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी देखील पद व गोपनियतेची शपथ घेतली होती. यंदाच्या मंत्रिमंडळात पंतप्रधान मोदींनी अनेक नव्या चेह-यांना संधी दिली आहे. ज्यामध्ये पद्म पुरस्कार प्राप्त माजी परराष्ट्र सचिव डॉ. सुब्रमण्यन जयशंकर (एस. जयशंकर) यांचा देखील समावेश आहे. मंत्रिमंडळातील त्यांच्या समावेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जयशंकर यांच्या कामकाजाचा अनुभव पाहता त्यांना परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयशंकर माजी परराष्ट्र सचिव होते, त्यामुळे त्यांना परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी दिल्या जाण्याची शक्यता होतीच. त्यांची परराष्ट्र धोरणांवर चांगली पकड आहे. त्यात यंदा माजी परराष्ट्र मंत्री असलेल्या सुषमा स्वराज मंत्रिमंडळात नसल्याने या शक्यतेला अधिक वाव होता. जयशंकर यांनी अमेरिकेबरोबर एटमी व्यवहाराचा मार्ग मोकळा करून देण्यात व अमेरिकेचे माजी राष्ट्र अध्यक्ष बराक ओबामा यांना प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणुन भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about indais new foreign minister s jaishankar
First published on: 31-05-2019 at 13:18 IST