Kolkata Doctor Rape and Murder : कोलकाता या ठिकाणी झालेल्या महिला डॉक्टरच्या बलात्काराचं ( Kolkata Doctor Rape ) आणि हत्येचं प्रकरण देशभरात चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. महिला डॉक्टरवर पाशवी बलात्कार ( Kolkata Doctor Rape ) झाला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. या घटनेत तिच्या सहकाऱ्यांनी आणि आई वडिलांनी रुग्णालय प्रशासनावर काही आरोप केले आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जातो आहे. पीडितेच्या आईने तिचा मृतदेह पाहिला तेव्हा काय अवस्था होती ते सांगितलं आहे.

नेमकी ही घटना काय घडली?

कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं. अशातच या महविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी या प्रकरणात काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

हे पण वाचा- “माझी मुलगी ओपीडी ड्युटीवर होती, सकाळी १० पर्यंत…” कोलकाता पीडितेच्या वडिलांचा उद्विग्न सवाल

पीडितेच्या सहकाऱ्यांनी काय प्रश्न उपस्थित केले आहेत?

आम्हाला वाटत नाही की हे फक्त बलात्कार ( Kolkata Doctor Rape ) आणि हत्येचं प्रकरण आहे. तिला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं. ती सेमिनार हॉलमध्ये एकटी काय करत होती हा प्रश्न आहेच. तिच्या दुसऱ्याही एका सहकाऱ्याने हेच म्हटलं आहे की हे प्रकरण वरवर दिसतं तेवढं साधं आणि सरळ नाही. संजय रॉयला म्हणजेच जो आरोपी आहे त्याला हे कसं कळलं की सेमिनार हॉलमध्ये पीडिता ( Kolkata Doctor Rape ) एकटी आहे? रॉय हा फक्त बळीचा बकरा आहे, यामागे इतर बडे मासे आहेत असाही संशय या डॉक्टरने व्यक्त केला आहे. एवढंच नाही तर या प्रकरणात कोण आहे ते शोधलं पाहिजे असं या पीडितेचे सहकारी म्हणाले. अशात आता या पीडितेच्या आईने जेव्हा पहिल्यांदा तिला मृतावस्थेत पाहिलं तेव्हा काय घडलं ते सांगितलं.

Kolkata Rape News
कोलकाता येथील रुग्णालयात डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी तिच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

काय म्हटलं आहे पीडितेच्या आईने?

“मला जेव्हा माझ्या मुलीच्या मृत्यूबाबत समजलं तेव्हा मी तातडीने रुग्णालयात गेले. माझ्याबरोबर माझे पतीही होते. आम्हा दोघांनाही सुरुवातीला आमच्या मुलीचा मृतदेह पाहू दिला नाही. ३ वाजता तिचा मृतदेह जेव्हा आम्हाला पाहू दिला तेव्हा तिच्या मृतदेहावर पँट नव्हती. तसंच तिच्या मृतदेहावर फक्त एकच कपडा होता. तिचा हात तुटला होता, तिच्या डोळ्यांमधून आणि तोंडातून रक्त वाहिल्याचं दिसत होतं. मी त्यांना सांगितलं माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही तिची हत्या झाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कलम १४४ लागू केलं आहे.” असं म्हणत पहिल्यांदा मुलीचा मृतदेह पाहिला तेव्हा काय घडलं ते पीडितेच्या आईने सांगितलं आहे. पांचजन्यने ही पोस्ट केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित मुलीचा मृत्यू ( Kolkata Doctor Rape ) झाल्याचं जेव्हा तिच्या आई वडिलांना सांगण्यात आलं तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिच्यावर कामाचा प्रचंड दबाव होता असं पोलिसांना सांगितलं. या प्रकरणाचा सीबीआय तपास सुरु आहे. पोलीस तपासावरुन हे समोर येतं आहे की पहाटे ३ ते ५ या कालावधीत तिच्यावर बलात्कार ( Kolkata Doctor Rape ) करण्यात आला, तसंच तिची हत्या करण्यात आली.