राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका तरुणाने कोरियन युट्यूबरसमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. दरम्यान, याप्रकरणी जोधपूर पोलिसांनी कारवाई केली असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – कोण आहे अतिक अहमदची पत्नी शाईस्ता परवीन? पोलिसाची मुलगी असूनही ‘या’ कारनाम्यांमुळे झाली मोस्ट वाँटेड

पीडित कोरियन युट्यूबर तरुणी राजस्थानममध्ये पर्यटनासाठी आली होती. यावेळी ती जोधपूरमधील पचेटिया हिलवर पोहोचली. मात्र, या टेकडीवरून खाली उतरताना एका तरुणाने तिचा पाठलाग सुरू केला. ती टेकडीवरील एका निर्जनस्थळी पोहोचताच त्याने तिच्या समोरच अश्लील कृत्य केले. त्यानंतर ती तरुणी मदत मागण्यासाठी वेगाने खाली उतरली.

हेही वाचा – टायटॅनिकवरील मेन्यूकार्ड सोशल मीडियावर व्हायरल, १११ वर्षांपूर्वी दिले जात होते ‘हे’ पदार्थ

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हारल झाला. दिल्ली महिला आयोच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही हा व्हिडीओ शेअर करत आरोपी तरुणावर कडक कारवाईची मागणी केली. तसेच त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिले.

हेही वाचा- Video : उमेदवारी अर्ज भरण्याकरता आणली १ रुपयाची १० हजार नाणी, चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांची दमछाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्त्वाचं म्हणजे, काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार मुंबईतही उघडकीस आला होता. मुंबईतील खार परिसरात दोन तरुणांनी दक्षिण कोरियाच्या एका ब्लॉगरबरोबर छेडछाड केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती.