पीटीआय, इम्फाळ

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष ‘कुकी पीपल्स अलायन्स’ (केपीए) ने मणिपूरमधील भाजपच्या एन. बीरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय रविवारी घेतला. या पक्षाचे दोन आमदार आहेत.

Loksabha Election 2024 Nitish Kumar JDU Bihar Munger Rajiv Ranjan Singh
मोदींची ‘विदाई’ बिहारमधून होईल म्हणणारा उमेदवारच देऊ लागला चारशेपारच्या घोषणा
Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
supriya sule marathi news, goa cm pramod sawant marathi news
“सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर

‘केपीए’चे अध्यक्ष तोंगमांग हाकीप यांनी, मणिपूरमधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारशी संबंध तोडण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती राज्यपाल अनुसुया उईके यांना पत्राद्वारे दिली. ‘‘सध्या राज्यात उफाळलेल्या हिंसाचाराबाबत सखोल विचार केल्यानंतर, मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला दिलेला पाठिंबा कायम ठेवणे उपयोगी ठरणार नाही. त्यानुसार, सरकारला असलेला ‘केपीए’चा पाठिंबा काढून घेण्यात आला आहे, असेही या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये कुकी-झोमी आणि मैतेईंच्या वांशिक हिंसाचारात गेल्या तीन महिन्यांत १६०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

संख्याबळ..

६० सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत ‘कुकी पीपल्स अलायन्स’चे दोन आमदार आहेत. भाजपची सदस्यसंख्या ३२ आहे. भाजपला नागा पीपल्स फ्रंट आणि तीन अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. विरोधकांच्या संख्याबळात नॅशनल पीपल्स पार्टीचे सात, काँग्रेसचे पाच आणि जनता दलाच्या (संयुक्त) सहा आमदारांचा समावेश आहे.