बनावट नोटांचा सुळसुळाट रोखणे आणि नोटांचे आयुष्य वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, कागदी नोटांऐवजी प्लॅस्टिकच्या नोटा प्रायोगिक तत्वावर बाजारात आणण्यात येणार आहेत. सुरूवातीला दहा रूपये मुल्याच्या एक अब्ज प्लॅस्टिक नोटा देशातील पाच शहरामध्ये चलनात येणार आहेत. मात्र, सध्या चलनात असलेल्या कागदी नोटांचा वापरही पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये या नोटा चलनात येणार आहेत. जर प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण देशात दहा रुपयाच्या प्लॅस्टिकच्या नोटा अस्तित्वात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2014 रोजी प्रकाशित
दहा रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा लवकरच बाजारात!
बनावट नोटांचा सुळसुळाट रोखणे आणि नोटांचे आयुष्य वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

First published on: 29-11-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Launch of rs 10 plastic currency notes