दररोज वीस मिनिटे मोझार्टचे संगीत श्रवण केल्यास मेंदूचे कार्य सुधारते, अध्ययन व स्मृती यांच्यात चांगला फरक दिसून येतो असे संशोधनात दिसून आले आहे.शास्त्रीय संगीताने मेंदूतील ‘डोपॅमाईन’ हे रसायन स्त्रवण्यास ज्या जनुकांची मदत होत असते त्यांचे कार्य सुधारते तसेच त्याचे वहन व्यवस्थित होते. मेंदूतील जे संदेशवहन न्यूरॉन्सच्या सिनॅप्ससिस सर्किट मार्फत चालू असते त्यामुळे अध्ययन सुधारते व स्मृती वाढते, तसेच मेंदूचा ऱ्हास करणाऱ्या जनुकांना लगाम बसतो.संगीत अध्ययनाशी संबंधित काही जनुके असतात, त्याचबरोबर काही पक्षी गोड गातात त्यांच्यातही ही किमया जनुकांनी साधलेली असते. त्यांच्या अनेक प्रजातीत संगीत आकलनाची प्रक्रिया उत्क्रांत होताना दिसते.
संगीत आकलन हे मेंदूचे सर्वात अवघड कार्य असते व ते न्यूरॉन्समधील व शारीरिक बदलांमुळे शक्य होत असते. असे असले तरी संगीताचा मानवी मेंदूवर होणारा परिणाम तपासण्यात आला नव्हता. शास्त्रीय संगीताने जनुकांचे आविष्करण सुधारते, जे संगीत जाणतात किंवा जाणत नाहीत तरी ऐकतात त्यांनाही त्याचा सारखाच फायदा होतो.
डब्ल्यूए मोझार्टच्या व्हायोलिन संगीत मैफली एनआर ३, जी मेजर, के २१६ या वीस मिनिटांच्या आहेत पण त्या ऐकल्याने डोपॅमाईनचे स्त्रवण वाढते. स्मृती वाढते तसेच मेंदूतील सिनॅप्सिस नावाची न्यूरॉन सर्किटस (मंडले) चांगली काम करतात.
पार्किन्सन आजार ज्यांना असतो त्यांच्यात सायन्युक्लेन अल्फा नावाचे जनुक महत्त्वाची भूमिका पार पाडते, ते मेंदूच्या एका विशिष्ट जोडणीच्या भागात असते. त्याच्या अतिक्रियाशीलतेने व उत्परिवर्तनाने हा रोग होतो, पण या जनुकामुळेच पक्षी संगीताचे आकलन करून घेऊ शकतात व संगातीच्या आकलनाशी त्याचा जवळून संबंध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Listening to classical music modulates genes that are responsible for brain functions
First published on: 20-03-2015 at 12:42 IST