भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या(इस्रो) तब्बल वीस उपग्रहांना एकाच वेळी अवकाशात घेऊन जाणाऱया ‘पीएसएलव्ही-सी३४’ या प्रक्षेपकाचे श्रीहरिकोटा येथून बुधवारी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी यशस्वी उड्डाण झाले. विशेष म्हणजे, इस्रोच्या या प्रक्षेपकामध्ये समाविष्ट असलेल्या २० उपग्रहांमध्ये गुगल कंपनीच्या उपग्रहासह भारतीय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दोन उपग्रहांचा देखील समावेश आहे. सत्यभामासॅट व स्वयम, अशी या भारताच्या दोन शैक्षणिक उपग्रहांची नावे आहेत. ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपकाचे हे ३६वे उड्डाण असून, इतर अवकाश संस्थांच्या दहापट कमी खर्चात ही मोहीम राबवली गेली.
वाचा : … आणि पुण्यातील ‘सीओईपी’चा ‘स्वयम’ अवकाशात झेपावला!
इस्रोच्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रात सोमवारी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी म्हणजे तब्बल ४८ तास अगोदर पीएसएलव्हीसी-३४ या प्रक्षेपकाच्या प्रक्षेपणासाठीचे काऊंटडाऊन सुरू झाले होते. त्यानंतर आज सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी प्रक्षेपक अवकाश झेपावला. या मोहिमेच्या यशासह इस्रोने एकाच वेळी २० उपग्रह अवकाशात सोडून नवा इतिहास रचला आहे. इस्रोने याआधी पीएसएलव्हीच्या मदतीने २८ एप्रिल २००८ रोजी १० उपग्रह एकाच वेळी सोडले होते तर अमेरिकेच्या मिनोटॉर १ अग्निबाणाने २९ उपग्रह एकाच वेळी सोडले होते. रशियाच्या डीएनईपीआर अग्निबाणाने एकाच वेळी ३३ उपग्रह सोडले होते. पीएसएलव्ही प्रक्षेपक ३२० टनांचा असून, त्यात कॅनडा, इंडोनेशिया, जर्मन व अमेरिका यांचे १७ उपग्रह आहेत. त्यात भारताचा काटरेसॅट उपग्रह मोठा म्हणजे ७२७ किलो वजनाचा आहे.

7pslv-c34firststageintegrationinprogress

LIVE VIDEO:

 

‘पीएसएलव्ही-सी३४’ यानाचे संपूर्ण प्रोफाईल-
isro-launch