पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं भी चौकीदार’ या मोहिमे अंतर्गत बुधवारी देशभरातील २५ लाख चौकीदारांशी ऑडिओ संवाद साधला. होळीच्या शुभेच्छा देत त्यांनी चौकीदारांना चोर म्हटले जात असल्यामुळे त्यांची माफी मागितली. तसेच देशातील कामदारांचा अपमान करणे ही नामदारांची सवय असल्याची टीका त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली.

मोदी म्हणाले, जगभरातील सर्व भाषेतील लोकांना आता चौकीदार शब्दाचा अर्थ माहीत झाला आहे. त्यांनी मनापासून हा शब्द स्वीकारल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही पाहिले असेल सध्या तुम्हा लोकांचीच चर्चा सुरू आहे. टीव्ही असो वा सोशल मीडिया, भारत असो किंवा विदेश..आज प्रत्येक भारतीय ‘मैं भी चौकीदार’ असे म्हणत आहे.

पुढे ते म्हणाले, मी तुम्हा लोकांची माफी मागतो. कारण मागील काही महिन्यांपासून काही लोक आपल्या वैयक्तिक हितांसाठी चौकीदारांविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. या लोकांच्या भाषेमुळे तुमच्या भावनेला ठेस पोहोचली आहे. हे खूप दुर्दैवी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मोदींनी अनेकवेळा स्वत:ला देशाचा रखवालदार, प्रधानसेवक आणि दक्ष चौकीदार म्हटले आहे. त्यांनी अनेक भाषणांमध्ये भ्रष्टाचार करणार नाही आणि कोणाला करूही देणार नसल्याचे म्हटले आहे.