अफझल गुरु याला फासावर चढविण्यात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी मंगळवारी तीन तासांसाठी शिथील करण्यात आली.
शहरातील राममुन्शी बाग, राजबाग, कोठीबाग, शेरगढी आणि सद्दर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी सायंकाळी चारपासून शिथिल करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतल्याचे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. संचारबंदी शिथिल करण्यात आल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नंतरच काश्मीरमधील अन्य भागांमध्ये लागू केलेली संचारबंदी शिथिल करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
संचारबंदी शिथिल करण्यात आली असली तरी लोकांना त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लोकांची वर्दळ दिसत नव्हती.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2013 रोजी प्रकाशित
श्रीनगरमधील संचारबंदी शिथील
अफझल गुरु याला फासावर चढविण्यात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी मंगळवारी तीन तासांसाठी शिथील करण्यात आली. शहरातील राममुन्शी बाग, राजबाग, कोठीबाग, शेरगढी आणि सद्दर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी सायंकाळी चारपासून शिथिल करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी
First published on: 13-02-2013 at 05:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lose us the curfew in shree nagar