Gorakhpur UP Two Marriages Case : प्रेमविवाहाला विरोध होत असल्याने अनेकजण कुटुंबांनी ठरवून दिलेल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करतात किंवा घरच्यांना धुडकावून प्रेमविवाह करतात. पण कोणी प्रेयसी आणि कुटुंबाची मर्जी राखण्याकरता दोन लग्न केल्याचं आठवतंय का? धक्कादायक म्हणजे दोन्ही लग्न एकाच दिवशी केल्याचं कोणी पाहिलंय का? पण असा धक्कादायक प्रयत्न उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने केला आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली असून त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गोरखपूरच्या हरपूर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे चार वर्षांपासून एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. पण त्यांच्या या नात्याला त्याच्या घरातून विरोध होता. त्यामुळे त्याने आपण ठरवून दिलेल्या मुलीशीच लग्न करावं असा आग्रह त्याच्या कुटुंबियांकडून केला जात होता. दरम्यान, त्याच्या प्रेयसीने आतापर्यंत दोनवेळा गर्भपात केला होता. पण जेव्हा ती पुन्हा गर्भवती राहिली तेव्हा तिला प्रसूतीसाठी एका वृद्धाश्रमात पाठवण्यात आले. तिथे तिची प्रसुती झाल्यानंतर त्या बाळाला एका परिचारिकेकडे ठेवण्यात आले. याच काळात या दोघांनी मंदिरात लग्नही केलं होतं. पण त्यांनी कोर्ट मॅरेज केलं तर त्यांचं नातं घरचे स्वीकारतील असं त्याने प्रेयसीला सांगितलं. त्यामुळे त्यांनी सकाळी कोर्टात जाऊन लग्न उरकले.

प्रेयसीने घरात जाताच तिचा अपमान

धक्कादायक म्हणजे, त्याचदिवशी सायंकाळी त्याचं लग्न त्याच्या घरच्यांनी ठरवलेल्या मुलीबरोबर पारंपरिक विधीने झाले. ही बाब त्याच्या प्रेयसीला कळताच ती त्याच्या घरी गेली. पण तिथे तिचा अपमान झाल्याचा दावा तिने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ पोलिस अधिकारी जितेंद्र कुमार श्रीवास्तव म्हणाले की, यासंदर्भात तक्रार मिळाली आहे आणि प्रेयसीने केलेले आरोप खरे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यारप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”