मालेगावमध्ये २००८ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आपल्याला अडकवण्यात आल्याचा आरोप करीत यासंबंधी चौकशीसाठी लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या खंडपीठातून यू. यू. लळित यांनी अचानक माघार घेतल्याने आज यावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता नव्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


२००८मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी लेफ्ट. कर्नल पुरोहित हे मुख्य आरोपी असून त्यांच्यावरील मोक्का हटवण्यात आल्याने ते सध्या जामीनावर तुरुंगातून बाहेर आहेत. दरम्यान, या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) आपले अपहरण आणि छळ करण्यात आल्याचा आरोप पुरोहित यांनी केला आहे. तसेच आपल्याला यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार होती.

मात्र, सुनावणी करणाऱ्या खंडपीठातून न्या. यू. यू. लळित यांनी अचानक स्वतःला वगळण्याचा निर्णय घेतला, असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. त्यामुळे आता नव्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मात्र, ही याचिका कधी होईल याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lt col purohit has filed a plea before the sc seeking sit probe in the matter of his abduction and torture by ats
First published on: 27-08-2018 at 14:37 IST