Parliament Attack: संसदेत धुराचे लोट पसरवण्याचं आणि बाहेर घोषणा देण्याचं जे प्रकरण बुधवारी (१३ डिसेंबर) घडलं त्या प्रकरणातला आरोपी सागर शर्मा याच्या घरी पोलीस गेले होते. सागर शर्मा हा लखनौचा आहे. त्याने घरुन दिल्लीला येताना काय सांगितलं होतं ती माहिती आता समोर आली आहे. त्याचं सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांनी तपासलं तेव्हा पोलिसांना कळलं की तो अनेकदा केंद्र सरकारच्या विरोधात पोस्ट लिहित असे. एवढंच नाही तर मला इतिहास घडवायचा आहे अशीही पोस्ट त्याने लिहिली होती असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी सागरबाबत काय सांगितलं?

लखनऊ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर शर्मा हा भगत सिंग यांना आपला आदर्श मानत होता. तर हिंदू धर्माविरोधात तो पोस्टही करायचा. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अशा अनेक पोस्ट पोलिसांना सापडल्या आहेत. सागर शर्मा हा लखनऊच्या मानक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रामनगरचा रहिवासी आहे. तो इ रिक्षा चालवत होता. सागर शर्माच्या कुटुंबीयांनी हे सांगितलं आहे की तो दिल्लीत आंदोलन करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र कुणालाही हे माहीत नव्हतं की तो संसदेत जाऊन असं काही करणार आहे.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
a young man broke traffic rules while making reels
VIDEO : रील बनवण्याच्या नादात पठ्ठ्याने तोडले वाहतूक नियम, दिल्ली पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

घरातून निघताना सागरने आईला काय सांगितलं होतं?

“मी दिल्लीला जातो आहे. काहीतरी मोठं घडवून आणणार आहे” असं सागर म्हणाल्याचं त्याच्या आईने सांगितलं आहे. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे. सागरच्या बहिणीनेही हे सांगितलं आहे की सागर आईशी बोलत होता तेव्हा मी ऐकलं की तो दिल्लीला काहीतरी आंदोलन करायला जाणार आहे. तो काय करणार आहे हे कुणालाही माहीत नव्हतं. याआधी तो कधीही असं वागला नव्हता. त्यामुळे तो काय करणार आहे ठाऊक नव्हतं असंही त्याच्या बहिणीने सांगितलं आहे.

लोकसभा घुसखोरी प्रकरणी राजनाथ सिंह यांचं निवेदन; म्हणाले, “कुणालाही पास देताना…!”

मानकनगर पोलीस ठाण्याचे अधीक्षक शिव मंगल सिंह यांनी सांगितलं की सागर शर्मा हा २८ वर्षांचा तरुण त्याच्या आई-वडिलांसह आणि बहिणीसर रामनगर भागात भाडे तत्वावर घेतलेल्या घरात राहतो. त्याचे वडील काम करतात. तर सागर ई रिक्षा चालवतो. मागच्या दहा वर्षांपासून हे सगळे रामनगरमध्येच राहात आहेत. लोकसभेत ज्यांनी धुराचे लोट पसरवले त्यापैकी एक आरोपी हा सागर शर्मा आहे तर दुसार आरोपी मनोरंजन डी आहे. या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं बुधवारी?

१३ डिसेंबरच्या दिवशी म्हणजेच बुधवारी लोकसभेत घुसून दोन तरुणांनी धुराचे लोट पसरवले. २२ वर्षांपूर्वी १३ डिसेंबरच्या दिवशीच संसदेवर हल्ला झाला होता. लष्कर एक तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता. त्याच दिवशी ही घटना घडली. ज्यानंतर एकच गदारोळ झाला. संसदेतल्या खासदारांनी दोन्ही तरुणांना पकडलं आणि सुरक्षा दलांच्या ताब्यात दिलं. सुरक्षा दलांनी त्यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांवर UAPA च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.