फोर्ब्स मासिकात जगातील प्रभावशाली व्यक्तीच्यां यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड झाल्यावरून मध्यप्रदेश विधानसभेत अभिनंदन ठराव मांडण्यात आला. मात्र भाजपाकडून मांडलेल्या या अभिनंदन प्रस्तावाला कॉंग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.
भाजपाचे कैलाश विजयवर्गीय यांनी यासंबधीचा ठराव मांडला. या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्ष सीताशरण शर्मा यांनी देखील अनुमोदन दिले. अध्यक्षांनी कोणत्या नियमाखाली अभिनंदन ठरावाला अनुमोदन दिल्याचा काँॅंग्रेसचे बाला बच्चन यांनी आक्षेप घेतला.
२०१४ साली फोर्ब्सने नरेंद्र मोदी यांची प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत १४ व्या स्थानी निवड केली होती, तर २०१५ साली मोदींना ९ वे स्थान देण्यात आले आहे. या यादीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन पहिल्या स्थानावर आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2015 रोजी प्रकाशित
मोदींच्या अभिनंदन प्रस्तावाचा वाद
भाजपाकडून मांडलेल्या या अभिनंदन प्रस्तावाला कॉंग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.
Written by पीटीआयझियाउद्दीन सय्यद
First published on: 06-11-2015 at 01:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh assembly make proposal of modi congratulate create dispute