देशात करोना लशींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेकांना लस मिळणं कठीण झालं आहे. अनेकाना तासंतास रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही. तर अनेक ठिकाणी लशींचा अपुरा पुरवठा होत असल्याने लसीकरण केंद्र बंद आहेत. यामुळे सामन्य नागरिक हैराण आहेत. मात्र मध्य प्रदेशातील एका खासदाराने आपल्या कार्यलयात कुटुंबीय आणि स्टाफसह लस घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त टीकेचा भडिमार सुरु केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशातील उज्जैनमधून खासदार असलेले अनिल फिरोजिया यांनी आपल्या कार्यालयात करोना लस घेतल्याने चर्चेत आहेत. खासदार फिरोजिया यांच्या घरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत खासदार आणि त्यांचे समर्थक लस घेताना दिसत आहेत. भाजपा कार्यकर्ते कपिल कटारिया यांनी सोशल मीडियावर फोटो टाकल्याने संबंधित प्रकार उघडकीस आला. या फोटोमुळे सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?; फडवीसांचा सोनियांना सवाल

‘मी तेव्हा घरी नव्हतो. माझी आई वयस्कर आहे. तिच्या पायाला दुखापत झाली आहे. तेव्हा कपिल कटारिया या कार्यकर्त्याने मेडिकल टीमला घरी बोलवलं होतं. मला याबाबत पूर्वकल्पना असती तर मी त्याला असं करू दिलं नसतं’, असा बचावात्मक पवित्रा खासदार फिरोजिया यांनी पीटीआयशी बोलताना घेतला.

‘…उसने माँ गंगा को रुलाया है’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर अप्रत्यक्षरित्या टीका

खासदार फिरोजिया यांच्या कृतीमुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. उज्जैनचे काँग्रेस आमदार महेश परमार यांनी फिरोजिया यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘सामान्य नागरिक लसीकरणासाठी वणवण भटकत असताना खासदारांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला आहे. आपल्या घरातील ऑफिसमध्ये पूर्ण स्टाफसह लस घेत आहेत. लसीकरण केंद्र खासदारांच्या घरी सुरु केलं पाहीजे’ अशी टीका काँग्रेस आमदार महेश परमार यांनी केली. फिरोजिया यांच्या या कृतीनंतर विरोधकांनी त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh bjp mp firojiya vaccinate his staff and kin at home rmt
First published on: 15-05-2021 at 16:08 IST