मध्य प्रदेश बोर्डाचा निर्णय! इयत्ता नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात केली घट

या निर्णयामुळे करोना महामारीत शिक्षण घेताना अनेक अडचणींना तोंड देत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मध्य प्रदेश बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (एमपीबीएसई) ने शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी इयत्ता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम कमी केला आहे. विद्यार्थ्यांना या वर्षी देखील सुरू असलेल्या करोना लॉकडाउनमुळे शैक्षणिक उपक्रमांमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे पाहून एमपीबीएसईने इंग्रजी, हिंदी, संस्कृत, उर्दू, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञानाबरोबरच मानव्यविद्या, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व इयत्ता आणि शाखांसाठी हटवण्यात आलेल्या विषयांची यादी एमपीबीएसईच्या mpbse.nic.in. या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अशातच आसाममध्ये माध्यमिक शिक्षण बोर्ड (एसईबीए)ने इयत्ता नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात देखील घट केलेली आहे. काउन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन (सीआयएससीई)ने आयसीएसई(इयत्ता दहावी) आणि आयसीएसी(इयत्ता बारावी) परीक्षांचा अभ्यासक्रम कमी केला आहे. करोना संकट काळात विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी पाहता अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

या अगोदर देखील मध्य प्रदेश सरकारने पहिल्यांदाच शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण पारदर्शी आणि पेपरलेस बनवण्यासाठी एक ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणाली सुरू केली आहे. मध्य प्रदेशची ही ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणीला जियो टॅग तंत्रज्ञानावर आधारित असेल आणि सध्या चालू शैक्षणिक वर्षादरम्यान तीन कोटी ५५ लाख पुस्तकांचे वितरण करण्याचा प्रयत्न करेल. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी)च्या सहकार्याने ऑनलाइन जियो-टॅगिंग प्रणाली तयार करण्यात आली आहे. ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणाली पाठ्यपुस्तक महामंडळाकडून पुस्तके ट्रॅक करण्याचा प्रयत्न करते. जिथे शालेय विद्यार्थ्यांना वितरित करण्यासाठी ते मुद्रित केले जातात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Madhya pradesh boards decision decrease in the syllabus of class ix to xii msr