मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यात लग्नाच्या वहाऱ्डाला घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. वहाऱ्डी मंडळींनी खच्चून भरलेला हा ट्रक पुलावरुन थेट सन नदीपात्रात कोसळला. अजूनही अनेक जण या ट्रकमध्ये अडकून पडलेले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.

सिंगरौली जिल्ह्यातून हा ट्रक लग्नासाठी सीधीच्या दिशेने जात असताना अपघात झाला. हा ट्रक ६० ते ७० फूट खोल नदीपात्रात कोसळला. जखमींना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस आणि जिल्हाधिकारी घटनास्थळावर पोहोचले असून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.