महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये काजळपुरा परिसरातील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेमध्ये काहींचा मृत्यू झाला असून जखमींवर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाच वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यात ४५ कुटुंबे राहात होती. दुपारनंतर इमारत खचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे २५ कुटुंबांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. इमारतीचे वरचे तीन मजले पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या घटनेबाबत भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाड येथे इमारत कोसळून जीवित हानी झाल्याची घटना वेदनादायी आहे. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ पथक, बचाव आणि मदत कार्य करत आहेत”, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- महाड इमारत दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख

आणखी वाचा- देव तारी त्याला कोण मारी! महाड दुर्घटनेच्या अठरा तासांनंतर सहा वर्षांचा चिमुकला सुखरुप बाहेर

याचसोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुनही यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. “महाराष्ट्रातील रायगडमधील महाड येथील इमारत दुर्घटनेमुळे दु:ख झालं आहे. माझ्या सद्भभावना जवळच्या व्यक्ती गामवलेल्यांबरोबर आहेत. जखमींना लवकर बरं वाटो अशी प्रार्थना करतो. दुर्घटनेच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या टीम आणि एनडीआरएफच्या टीम मदतकार्य करत आहेत,” असे हे ट्विट आहे.

आणखी वाचा- महाड इमारत दुर्घटना : बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल, बचावकार्य अजूनही सुरूच

दरम्यान, दुर्घटनेनंतर नगरपालिका, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या साहाय्याने मदतकार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्यांवर महाड येथील ट्रॉमाकेअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकड्या तात्काळ पुण्याहून रात्री एकच्या सुमारात घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनीही मदतकार्य सुरु केलं आहे. दुर्घटनेनंतर घटनास्थळावर पाच डॉक्टरांचे पथक तैनात ठेवण्यात आले आहे. तसेच जखमींना रक्ताची गरज लागण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरेसा रक्तसाठा महाड, माणगाव रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि जिल्ह्यातील विविध भागांतून रुग्णवाहिका महाडला पाठविण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahad building collapse incidence in raigad district of maharashtra president of india express anguish vjb
First published on: 25-08-2020 at 12:16 IST