MSBSHSE Exam 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (MSBSHSE) २०२२-२३ शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या परीक्षेची सुरुवात उद्या (२ मार्च २०२२) पासून होणार आहे. या परीक्षेची सुरुवात प्राथमिक भाषेच्या पेपरने होणार आहे. उद्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी या भाषांमध्ये हजारो विद्यार्थी पेपर देणार आहेत. तसेच जर्मन, फ्रेंच या विषयांसाठी द्वितीय किंवा तृतीय भाषेची परीक्षाही उद्याच होणार आहे. २ मार्च ते २५ मार्च असा या परीक्षेतचा कालावधी आहे. दहावीचे वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वपूर्ण असते.  या परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असते. 

महाराष्ट्र राज्य बोर्डाची दहावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहेत. यानुसार SSCची परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी सकाळी ११ वाजता पेपर देतील, तर उरलेले विद्यार्थी दुपारी ३ वाजता परीक्षेला बसणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या ३० मिनिटांपूर्वी परीक्षा केंद्रात हजर राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडे शाळेचे ओळखपत्र आणि  MSBSHE दहावीचे प्रवेशपत्र अनिवार्य आहे. याशिवाय त्यांना परीक्षेला बसता येणार नाही. तीन तासांच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये अधिक दहा मिनिटे जोडण्यात आली आहेत. परीक्षा देणाऱ्यांनी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी शिक्षण मंडळाने या दहा मिनिटांमध्ये वेळ दिला आहे. 

cbse, CBSE Warns Against Fake Circulars, Central Board of Secondary Education, CBSE Class 10th and 12th Results, CBSE Confirms Class 10th and 12th Results, cbse 10th and 12th, CBSE Class 10th and 12th Result 2024 dates, marathi news, cbse news, students, teacher,
सीबीएसईकडून दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट… निकाल कधी जाहीर होणार?
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षांबाबत झाला महत्त्वाचा बदल… किती वेळा होणार परीक्षा?
Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?

आणखी वाचा – LPG Cylinder Price hiked: घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ; दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री

यंदाची एसएससीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण मंडळाने काही योजना आखल्या आहेत. कॉपीमुक्त परीक्षा या मोहिमेअंतर्गत, दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या काळात परीक्षा केंद्रांच्या ५० मीटरच्या परिसरातील फोटोकॉपीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय गैरप्रकार घडू नये म्हणून केंद्रांभोवती पोलिस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

दहावी परीक्षांचे वेळापत्रक –

  • २ मार्च २०२३ – सकाळी १ १ वाजता प्राथमिक भाषा (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी) / दुपारी ३ वाजता द्वितीय भाषा (फ्रेंच, जर्मन)
  • ३ मार्च २०२३ – द्वितीय/तृतीय भाषा (मराठी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी) 
  • ४ मार्च २०२३ – मूलभूत तंत्रज्ञानाचा परिचय, ऑटोमोटीव्ह सर्व्हिस टेक्निशियन असे तांत्रिक पेपर
  • ६ मार्च २०२३ – इंग्रजी
  • ८ मार्च २०२३ – हिंदी
  • १० मार्च २०२३ – द्वितीय किंवा तृतीय भाषा (उर्दू, संस्कृत, गुजराती, पाली, अर्धमागधी, पर्शियन)
  • १३ मार्च २०२३ – बीजगणित (Algebra)
  • १५ मार्च २०२३ – भूमिती (Geometry)
  • १७ मार्च २०२३ – विज्ञान १
  • २० मार्च २०२३ – विज्ञान २
  • २३ मार्च २०२३ – इतिहास आणि नागरिकशास्त्र
  • २५ मार्च २०२३ – भूगोल