Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला असताना तृणमूल काँग्रेसनेही आता यामध्ये उडी घेतली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांसोबत थांबलेल्या गुवाहाटीमधील हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. राज्यात पूर आल्याने लोकांचा जीव जात असताना महाराष्ट्रातील लोकांचं आदरातिथ्य केलं जात असल्याने तृणमूलच्या नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे.

“जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे…,” बंडखोर आमदारांवर संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले “बाळासाहेबांचे भक्त नाहीत”

Maharashtra Political Crisis Live : विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती? दिपाली सय्यदला पडला प्रश्न, वाचा प्रत्येक अपडेट…

एकनाथ शिंदे इतर आमदारांसोबत गुवाहाटीमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते भाजपाविरोधात आंदोलन करत आहेत. “आसामला पुराचा फटका बसला असताना भाजपा मात्र घोडेबाजार करण्यात व्यग्र आहे. केंद्राकडून एक रुपयाची मदतही अद्याप मिळालेली नाही. भाजपा आमदारांची विक्री करण्यात व्यग्र आहे,” अशी टीका तृणमूलच्या नेत्याने केली आहे.

पोलिसांनी तृणमूलचे नेते रिपून बोरा यांना इतर आंदोलकांसहित हटवलं आहे. बोरा यांनी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्यावर टीका करताना पुरामुळे लोकांचा जीव जात असताना महाराष्ट्रातील असंतृष्ट लोकांचं आदरातिथ्य करण्यात व्यग्र आहेत अशी टीका केली आहे.

दरम्यान आसामचे कॅबिनेट मंत्री अशोक सिंघल रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी शिवसेना आमदारांची भेट घेतल्याची माहिती आहे. दुसरीकडे आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचले होते.