All India Pregnant Job Scam in Bihar : बिहार पोलिसांनी एका अनोख्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये अपत्यहीन महिलांना गरोदर करण्याच्या बदल्यात ५ लाख रुपये पुरुषांना देण्याचे आमिष दाखवण्यात आले आहे. शुक्रवारी पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. नवादा जिल्ह्यातून प्रिन्स राज, भोला कुमार आण राहुल कुमार यांना अटक करण्यात आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब (बेबी बर्थ सर्व्हिस) आणि प्लेबॉय सर्व्हिस यांसराख्या कार्यक्रमांच्या नावाखाली फसवणूक करणारे, लोकांना फोन करून आमिष दाखवून पैसे उकळत होते. या टोळीने भारतातील अनेक राज्यांमध्ये अनेकांची फसवणूक केली आहे. आतापर्यंत फसवणूक झालेल्यांची संख्या जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

हेही वाचा >> Russia : रशियामध्ये विद्यार्थिनींना मुलं जन्माला घालण्यासाठी दिले जातायत ८० हजार रुपये, नेमकं कारण काय?

यशस्वी गर्भधारणेसाठी ५ लाख रुपये

/

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारे वेगवेगळ्या राज्यातील लोकांना फोन करून किंवा व्हॉटस्अॅप करून संवाद साधत होते. ज्या स्त्रियांना मूल होत नाही, त्यांना यशस्वीरित्या गर्भधारणा करण्याचं करण्याचं आमिष दाखवलं जातं. प्रक्रिया अयशस्वी झाल्यास अतिरिक्त ५० हजार रुपये देण्याचे खोटं आश्वासनही देण्यात आलं होतं. परंतु, यासाठी आधी त्यांना पाच लाख रुपये भरावे लागत होते.

पीडितांनी स्वारस्य दाखवल्यानंतर ही टोळी ५०० रुपयांपासून २० हजारांपर्यांत ऑनलाईन नोंदणी शुल्काची मागणी करत होती. दरम्यान अटक करण्यात आलेल्यांकडून पोलिसांनी सहा स्मार्टफोन जप्त केले आहे. कॉल लॉग्स, व्हॉट्सअॅप फोटो, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि व्यवहार तपशीलांसह दोषी पुरावे जप्त केल्यानंतर पोलिसांनी टोळीच्या संपूर्ण नेटवर्कचे मॅपिंग सुरू केले आहे.