राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याबद्दल अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हैदराबादमधील न्यायालयाने आदेश दिल्यानंतर फलकनुमा पोलीस ठाण्यामध्ये तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
राष्ट्रीय चिन्हांचा अवमान करण्याविरोधातील कायद्यानुसार मल्लिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्लिकाने आपल्या आगामी ‘डर्टी पॉलिटिक्स’ या चित्रपटामध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान केला असल्याचा आरोप करीत दोन जणांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरूनच न्यायालयाने तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीसांना दिले. ‘डर्टी पॉलिटिक्स’ या चित्रपटाच्या एका पोस्टरवर मल्लिकाने आपल्या अंगावर राष्ट्रध्वज परिधान केला असल्याचे दृश्य प्रसिद्ध करण्यात आले. लालदिवा असलेल्या एका गाडीवर मल्लिका बसली असल्याचे या पोस्टरवर दिसत आहे. या पोस्टरवरूनच तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2014 रोजी प्रकाशित
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यावरून मल्लिका शेरावतविरुद्ध गुन्हा
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याबद्दल अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
First published on: 05-09-2014 at 12:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallika sherawat booked for insulting national flag