scorecardresearch

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का! सीबीआयने अनुब्रत मंडल यांना केली अटक, जाणून घ्या नेमकं कारण काय?

अनुब्रत मंडल यांना घरातून सीबीआयने केली अटक

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का! सीबीआयने अनुब्रत मंडल यांना केली अटक, जाणून घ्या नेमकं कारण काय?
अनुब्रत मंडल यांना सीबीआयने बेड्या ठोकल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी आणि पक्षाचे बिरभूम जिल्ह्याचे अध्यक्ष अनुब्रत मंडल यांना सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत. २०२० मधील जनावरांची तस्करी केल्याप्रकरणी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ११ ऑगस्टला बिरभूममधील त्यांच्या घरातून सीबीआयने त्यांना अटक केली.

गुरुवारी सकाळी सीबीआयचे अधिकारी अनुब्रत मंडल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत ३० गाड्यांचा ताफा होता. सीबीआयने त्यांची बंद खोलीत जवळपास दीड तास चौकशी केली, यानंतर त्यांना अटक केली. त्यांची आता वैद्यकीय तपासणी केली जाईल.

‘ईडी’ ने जप्त केलेले पैसे माझे नाहीत : पार्थ चॅटर्जी

तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी यांना शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी अटक झालेली असतानाच आणखी एका नेत्यावर कारवाई झाल्याने ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे. अनुब्रत मंडल यांची याआधी केंद्रीय तपास यंत्रणेकडून दोन वेळा जनावर तस्करीप्रकरणी चौकशी झाली होती.

सीबीआयने २०२० मध्ये जनावर तस्करी प्रकऱणी गुन्हा दाखल केल्यानंतर अनुब्रत मंडल यांचं नाव समोर आलं होतं. सीबीआयच्या माहितीनुसार, २०१५-१७ दरम्यान सीमा सुरक्षा दलाने सीमेपार तस्करी होणाऱ्या २० हजार जनावारांना पकडलं होतं. याचप्रकरणी सीबीआयने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही ठिकाणावरं छापे टाकले होते. अनुब्रत मंडल यांचा सुरक्षारक्षक सैगल हुसेन यालाही अटक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या