स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रोखण्याचे षड्यंत्र माकप, काँग्रेस आणि भाजप यांनी रचले असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. विरोधकांना पराभवाची भीती असल्याने ते निवडणूक प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ममतांनी जंगलमहल येथील प्रचारसभेत केली. तृणमूल काँग्रेस या निवडणुकांमध्ये विजय मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधक केवळ केसेस दाखल करण्यात पैसे खर्च करत आहेत. प्रचारात ते कोठेच दिसत नसल्याचा आरोपही ममतांनी केला. या निवडणुका जर नियोजित वेळेत झाल्या नाहीत तर त्याला विरोधक जबाबदार असतील असा इशारा त्यांनी दिला.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2013 रोजी प्रकाशित
‘निवडणुका रोखण्याचे विरोधकांचे षड्यंत्र’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रोखण्याचे षड्यंत्र माकप, काँग्रेस आणि भाजप यांनी रचले असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. विरोधकांना पराभवाची भीती असल्याने ते निवडणूक प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ममतांनी जंगलमहल येथील प्रचारसभेत केली. तृणमूल काँग्रेस या निवडणुकांमध्ये विजय मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

First published on: 27-06-2013 at 02:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata charges opposition with conspiracy to stall poll