Man eats chicken inside ISKCON restaurant Video Goes Viral : लंडनमधील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (इस्कॉन) च्या गोविंदा रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्ती फ्राइड चिकन खातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हे रेस्टॉरंट पूर्णपणे शाकाहारी असताना हा व्यक्ती मुद्दाम तेथे चिकन खात असल्याचा प्रकार समोर आल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अफ्रिकन-ब्रिटिश वंशांचा एक व्यक्ती गोविंदा या इस्कॉनच्या अत्यंत प्रसिद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये दाखल झाल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर तो व्यक्ती रेस्टॉरंटमधील महिला कर्मचाऱ्यांना येथे मांसाहारी पदार्थ मिळतात का? अशी विचारणा देखील करतो. यावर रेस्टॉरंटमधील कर्मचारी त्याला येथे मांस, कांदा किंवा लसूण असलेले पदार्थ मिळत नसल्याचे साांगतात, त्यानंतर तो व्यक्ती त्याने पिशवीतून केएफसीची चिकन बकेट बाहेर काढतो आणि त्यांच्या समोर चिकन खाऊ लागतो. यावेळी त्या महिला कर्मचारी त्याला तसे न करण्याबाबत आणि रेस्टॉरंटमधून बाहेर जायला सांगताना दिसत आहेत.

नेमकं काय झालं?

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे की तो व्यक्ती विचारतो की, “हाय, हे व्हिगन रेस्टॉरंट आहे का?” यावर रेस्टॉरंटमधील कर्मचारी हो असं उत्तर देते. त्यानंतर तो पुन्हा प्रश्न विचारतो की, “म्हणजे इथे मांस वगैरे काही मिळत नाही?”, यावर महिला कर्मचारी अगदी हसून सांगते की, येथे मांस, कांदा, लसूण मिळत नाही. यानंतर तो व्यक्ती तो घेऊन आलेला चिकनचा बॉक्स उघडतो आणि रेस्टॉरंटच्या आतमध्येच ते खायला सुरू करतो. इतकेच नाही तर तो तेथील कर्मचारी आणि इतर ग्राहकांना देखील चिकन हवे आहे का विचारू लागतो. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याला जाब विचारताना देखील पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर मुद्दाम करण्यात आलेल्या या कृतीनंतर लोक संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. मात्र या व्हिडिची सत्यता, घटनेचे ठिकाण किंवा तारीख याबद्दल पुष्टी होऊ शकलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर अनेकांनी हा धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच अनेकांनी कमेंट करत या व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी केली आहे.