आपल्या मुलीवर झालेल्या लैंगिक शोषणाचा बदला घेण्याकरता पित्याने कुवैतहून आंध्र प्रदेशपर्यंत प्रवास केला आणि लैंगिक शोषण करणाऱ्या मेव्हणीच्या सासऱ्याचा जीव घेतला. एवढ्यावरच हा पिता थांबला नाही. पुन्हा तो कुवैतमध्ये गेला आणि सोशल मीडियावरद्वारे त्याने केलेल्या कृत्याची माहिती अवघ्या जगाला दिली. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

प्रसाद आणि त्याची पत्नी चंद्रकला हे कामानिमित्त कुवैत येथे राहतात. तर त्यांची १२ वर्षी मुलगी चंद्रकलाच्या बहिणीच्या म्हणजे लक्ष्मी आणि व्यंकटरामण यांच्या घरी राहत होती. व्यंकटरामण यांचे वडील गुट्टा अंजनेयुलू यांनी १२ वर्षीय चिमुकलीचं लैंगिक शोषण केल्याची माहिती तिच्या आई-वडिलांना मिळाली. त्यामुळे त्यांनी ओबुलावरीपल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून कारवाई नाही

परंतु, तक्रार दाखल केल्यानंतर अंजनेयुलूला फक्त पोलिसांनी इशारा देऊन सोडलं. त्यामुळे अस्वस्थ झालेले प्रसाद ७ डिसेंबर रोजी भारतात आले. त्यांनी अंजनेयुलू यांना जीव मारलं. त्यानंतर प्रसाद पुन्हा कुवैतला पोहोचले. इकडे त्यांच्या मृत्यूचं गुढ वाढलं. त्यांची हत्या कोणी केली, याची चौकशी सुरू झाली.

हेही वाचा >> Atul Subhash : “मला जनावरासारखे वागवले…”, काय आहेत अतुल सुभाष यांच्यावर पत्नी निकिताचे आरोप?

मुलीच्या बचावासाठी केली हत्या

c

पोलिसांनी सुरुवातीला या मृत्यूप्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद केली. पण कुवैतमध्ये पोहोचताच प्रसाद यांनी व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी या हत्येची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी व्हिडिओ जारी करून सविस्तर घटना विषद केली. तसंच, मुलीच्या बचावासाठी हे कृत्य केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीला या घटनेची संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. परंतु प्रसादच्या व्हिडिओनंतर या प्रकरणाचा खोल तपास सुरू करण्यात आला आहे.