चीनमधील माथेफिरू हल्लासत्राचे आणखी एक चित्र समोर आले आहे. मालमत्तेच्या वादातून संतापलेल्या एका माथेफिरूने केलेल्या चाकूहल्ल्यात सहा जण ठार आणि अन्य सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. वांघुआ गावातील झाओ हा मनोरुग्ण इसम कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून कमालीचा संतप्त झाला होता. त्यातूनच त्याने हे कृत्य केले.