पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे शरणागती पत्करण्यासाठी निघालेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्यासह आपच्या ५२ आमदारांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांची पोलिसांनी त्यांना सोडले आहे.
मनीष सिसोदीया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया व आमचे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासमोर शरणागती पत्करतील म्हटले होते. त्यानुसार पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्चा घेऊन जाणारे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया व अन्य आमदारांना पोलिसांनी तुघलक रोडवर रोखले. त्यानंतर मनीष शिसोदिया यांच्यासह काही आमदार आणि पोलिसांमध्ये मतभेद झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
भाजप व आम आदमी पक्ष यांच्यातील संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत. दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांना विनयभंग व लैंगिक छळाच्या आरोपाखाली शनिवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत सोमवापर्यंत तिहार कारागृहात त्यांची रवानगी केली आहे. दरम्यान, आमदाराच्या अटकेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manish sisodia aap mlas detained by delhi police on their way to pm modis residence
First published on: 26-06-2016 at 11:30 IST