scorecardresearch

अबकी बार… मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पेट्रोलच शतक!

करोना काळात महागाई सामान्यांची पाठ सोडत नसून देशात कासवगतीने पेट्रोल दरवाढ सुरुचं आहे

petrol and Diesel Price Today, petrol diesel price in mumbai, maharashtra
(संग्रहित छायाचित्र)

करोना काळात महागाई सामान्यांची पाठ सोडत नसून देशात कासवगतीने पेट्रोल दरवाढ सुरुचं आहे. मुंबईत पेट्रोल शंभरीपार गेले आहे. गोरेगावात पेट्रोल १००.०४ तर डिझेल ९१.१७ दराने विकल्या जात आहे. सलग होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांच्या फरकाने देशात इंधनाचे दर वाढविले जात आहेत. यापुर्वी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले होते. त्यानंतर  बुधवारी किंमती स्थिर होत्या. परंतु आज (गुरुवार) पुन्हा दर वाढले आहेत. आज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २४ पैसे आणि डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ केली आहे. मंगळवारी पेट्रोल २३ आणि डिझेल २७ पैसे महाग झाले होते.

मे महिन्यात आतापर्यंत एकूण १५ दिवस इंधन दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. या महिन्याच्या वाढीनंतर पेट्रोल ३.३३ रुपयांनी महाग झाले आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ३.८५ रुपयांनी महाग झाले आहे. एप्रिलमध्ये इंधनाचे दर काही प्रमाणात कमी करण्यात आले होते. त्यानंतर दर वाढविण्यात आले. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०० च्या पलीकडे विकले जात आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये देखील पेट्रोल शंभरीपार गेले आहे. गोरगावात पेट्रोल १००.०४ प्रति लिटर दराने विकल्या जात आहे.

आणखी वाचा – ‘माझ्या नशीबामुळे पेट्रोलचे दर कमी झाले तर जनतेसाठी चांगलं…’ मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल

राज्यात या १५ जिल्ह्यांनी गाठली शंभरी

मुंबईपुर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पेट्रोल शंभरीपार गेले आहे. यामध्ये अमरावती १००.४९, औरंगाबाद  १००.९५, भंडारा १००.२२, बुलडाणा १००.२९, गोंदिया १००.९४, हिंगोली १००.६९, जळगाव १००.८६, जालना १००.९८, नंदूरबार १००.४५, उस्मानाबाद १००.१५, रत्नागिरी १००.५३, सातारा १००.१२, सोलापूर १००.१०, वर्धा १००, वाशिम १००.३४, या जिल्ह्यात पेट्रोल दरवाढ झाली आहे.

काय आहेत आजचे दर

आज झालेल्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ९३.६८ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डिझेल ८४.६१ प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९९.९४ रुपये आहे तर डिझेल ९३.६८ रुपये प्रति लिटर विकले जात आहेत. गोरेगावमध्ये तर पेट्रोल शंभरीपार गेले आहे. गोरेगावात पेट्रोल १००.०४ प्रति लिटर दराने विकल्या जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९५.२८ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८९.३९ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर ९३.७२ आणि डिझेलची किंमत ८७.४६ रुपये प्रतिलिटर झाली आहे.

भोपाळमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०१.७७ रुपये तर डिझेल ९३.०७ रुपयांनी विकले जात आहे. लखनौमध्ये पेट्रोल ९१.२१ आणि डिझेल ८५ रुपये प्रति लिटर दराने विकल्या जात आहे.

चेक करा तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर

देशात तेलाच्या दरात दररोज सकाळी ६ वाजता सुधारित केले जातात. कारण देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजेपासून लागू होतात.

आपल्या फोनवरून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे आपण जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-05-2021 at 09:11 IST

संबंधित बातम्या