छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलीसांची भुसुरूंगरोधक गाडी उडवून दिल्यामुळे सोमवारी चार जवान शहीद झाले. या हल्ल्यामध्ये आठ जवान गंभीर जखमी झाले आहेत. सुरक्षादलाची ही गाडी उडवून देण्यासाठी नक्षलवाद्यांनी जास्त तीव्रतेचा स्फोट घडवून आणला. त्यामुळे भुसुरुंगरोधक गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
दंतेवाडा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून २५ किलोमीटरवर असलेल्या कोलनार येथे ही घटना घडली. या घटनेनंतर लगेचच जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळीच कांकेर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा जवानांना लक्ष्य केले. या घटनेनंतर नक्षलग्रस्त भागातील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2015 रोजी प्रकाशित
नक्षली हल्ल्यात छत्तीसगढमध्ये चार जवान शहीद, आठ जखमी
छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलीसांची भुसुरूंगरोधक गाडी उडवून दिल्यामुळे सोमवारी चार जवान शहीद झाले.
First published on: 13-04-2015 at 05:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maoists attack police camp in dantewada four killed