‘ही’ वनस्पती करु शकते करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत; भारतीय संशोधकांचा दावा

करोनावरील औषध शोधण्यासाठी सध्या अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे.

सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनावरील औषधं आणि लस शोधण्यास वैज्ञानिक दिवसरात्र एक करत आहे. अशावेळी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. समुद्रातील लाल शेवाळाचा यामध्ये उपयोग होऊ शकतो. तसंच यातूव काढलेल्या संयुगांचा वापर सॅनिटरी वस्तूंवरील आवरण बनवण्यासाठी केला जाईल. तसेच संसर्गविरोधी औषध बनवण्यासाठीही हे संयुग वापरलं जाऊ शकतं. रिलायन्स लाईफ सायन्सद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. नैसर्गिक स्त्रोत म्हणजेच वनस्पती आणि जीव, बॅक्टेरिया आणि काही मोठ्या झाडांपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनात आजारांविरोधात लढण्याची अधिक ताकद असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.

पॉली सॅकराइड्स, अल्गीनेट्स, फुकोडिन, कारागिनन, रमनन सल्फेटसारख्या नैसर्गिक संयुगांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीव्हायरल क्षमता असते. ‘मरिन रेड अल्गा पोरफिरिडियम इज ए सोर्स ऑफ सल्फेटेड पॉलिसॅकाराइड्स फॉर कंबेटिंग अगेंस्ट कोविड-१९’ या मथळ्याखाली हे संसोधन करण्यात आलं आहे. यामध्ये संशोधकांनी उपलब्ध आकड्यांच्या संदर्भात समुद्री शेवाळातून मिळणाऱ्या पॉलीसॅकाराइड्सच्या संभाव्य अँटी व्हायरस क्षमतेची चाचणी केली.

शेवाळाचे अनेक फायदे
पोरफाइरिडियमपासून मिळणाऱ्या सल्फेट पॉलिसेकेराइडवर करण्यात आलेल्या जगभरातील निरनिराळ्या संशोधनातून शेवाळ हे अनेक व्हायरल आजारांवरील उपचारात महत्त्वपूर्ण ठरू शकतं असं नमूद करण्यात आल्याचं प्रिप्रिन्टमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनपर माहितीत म्हटलं आहे. करोना व्हायरस श्वसन संसर्गाच्या नियंत्रणास विविध जैविक स्त्रोतांमधून प्राप्त केलेली कॅरीगीनची भूमिकाही स्तुत्य आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marine red algae may hold key to preventing spread of covid 19 reliance life science researchers jud

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या