Mars Orbiter craft non recoverable Mangalyaan mission over confirms ISRO ssa 97 | Loksatta

Mission Mangalyaan : आठ वर्ष कार्यरत, ४५० कोटींचा खर्च; इंधन संपल्याने मंगळयानाशी संपर्क तुटला

Mission Mangalyaan : भारताचा मंगळयानाशी संपर्क तुटला आहे. आठ वर्ष कार्यरत राहिल्यानंतर त्यातील इंधन संपल्याचं समोर आलं आहे.

Mission Mangalyaan : आठ वर्ष कार्यरत, ४५० कोटींचा खर्च; इंधन संपल्याने मंगळयानाशी संपर्क तुटला
mangalyaan

भारताचे ‘मिशन मंगळयान’ संपुष्टात आलं आहे. कारण, मंगळ ग्रहाची माहिती घेण्यासाठी पाठवलेल्या मंगळयानाचे इंधन आणि बॅटरी संपल्याचं स्पष्ट झालं आहे. आठ वर्षांनी मंगळयानशी संपर्क तुटल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इसरो ) जाहीर केलं आहे.

२०१३ साली मंगळयान हे उपग्रह भारताने सोडले होते. सहा महिन्यांचा कालावधी गृहीत धरून हे उपग्रह तयार करण्यात आले होते. मात्र, मंगळाच्या भोवती हे उपग्रह आठ वर्षांहून अधिक काळ कार्यरत राहिले. अलिकडेच मंगळावरती एकामागे एक अनेक ग्रहण झाली. यातील एक ग्रहण हा ७ तास १० मिनिटे चालले. उपग्रहाची बॅटरी ही केवळ १ तास ४० मिनिटे ग्रहणामध्ये काम करू शकते. दीर्घ ग्रहणाने उपग्रहाची बॅटरी सुरक्षित मर्यादा ओलांडून संपल्याने त्याने काम करणे बंद केले.

हेही वाचा – केजरीवाल सरकारकडून राष्ट्रपतींचा अवमान ; दिल्लीच्या नायब राज्यपालांचा आरोप

मंगळयान मोहिमेला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर २७ सप्टेंबर २०२२ रोजी एक बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी उपग्रहातील इंधन व बॅटरी संपल्याने यानाला परत मिळवता येणार नाही. मंगळयान मोहिमेला एक उल्लेखनीय वैज्ञानिक किर्ती म्हणून ओळखण्यात येईल. या मिशनने मंगळाच्या पृष्ठभागची वैशिष्टे, वातावरण आणि बाह्यमंडळातील वायूंच्या संरचनेची माहिती मिळाली, असे इसरोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी म्हटलं.

हेही वाचा – संघ-भाजपविरोधात लढण्यासाठी सक्षम कोण? ; काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मुद्दा

४५० कोटी रुपयांत निर्मिती

भारताने हे उपग्रह ५ नोव्हेंबर २०१२ साली सोडले होते. २४ सप्टेंबर २०१४ ते मंगळाच्या कक्षेत पोहचले. केवळ ४५० कोटी रुपयांमध्ये या उपग्रहाची निर्मिती झाली होती. मंगळाच्या पृष्ठभागाची वैशिष्ट्ये, आकारविज्ञान, खनिजपदार्थ आणि मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी हे उपग्रह मंगळाच्या दिशेने रवाना करण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
केजरीवाल सरकारकडून राष्ट्रपतींचा अवमान ; दिल्लीच्या नायब राज्यपालांचा आरोप

संबंधित बातम्या

‘I Have Got News’, श्रद्धाचं शेवटचं चॅट आलं समोर, मृत्यूच्या काही तास आधीच मित्राला पाठवला होता मेसेज
डेटिंग अॅपवरील बॉयफ्रेंडला भेटायला 5 हजार किमीचा प्रवास; अवयवांच्या विक्रीसाठी त्यानं केली तिची हत्या
VIDEO: ‘मालिश’नंतर सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडीओ समोर, तुरुंग अधिक्षकांच्या भेटीचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
क्रूरतेची हद्द! जंगलात नेऊन सेक्स करायला सांगितलं, नंतर अंगावर फेव्हिक्विक ओतलं अन्…; घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले
26/11 Mumbai Terror Attack: आता अमली दहशतवाद्यांनी शोधून काढला तस्करीचा नवा सागरीमार्ग, इराण ते मुंबई व्हाया…!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“आजचं भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त…” अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!
“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र
VIDEO: “आपल्या ताई मोठ्या हुशार निघाल्या, त्यांनी मोदींना राखी बांधली आणि…”, उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर गंभीर आरोप
Video : भिंतीचा आधार घेत पार्टीतून बाहेर पडली सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी; नेटकरी म्हणाले, “धड चालताही…”