scorecardresearch

Premium

मणिपूरमध्ये चित्रपटाप्रमाणे बँक लुटण्याचा प्रकार, १८ कोटी ८० लाखांच्या चोरीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

मणिपूरमधील उखरूल जिल्ह्यात एखाद्या चित्रपटात बँकेची लूट दाखवली जाते त्याप्रमाणे नाट्यमय चोरी झाली आहे. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेतून १८ कोटी ८० लाख रुपयांची लूट केली.

Manipur Bank Robbery
मणिपूरमध्ये बँक लुटत १८ कोटी ८० लाखांची चोरी (छायाचित्र – व्हायरल व्हिडीओ स्क्रिनशॉट)

मणिपूरमधील उखरूल जिल्ह्यात एखाद्या चित्रपटात बँकेची लूट दाखवली जाते त्याप्रमाणे नाट्यमय चोरी झाली आहे. चेहरा झाकलेल्या चोरांनी बंदुकीचा धाक दाखवत पंजाब नॅशनल बँकेतून १८ कोटी ८० लाख रुपयांची लूट केली. ही बँकेची अशी शाखा होती जेथे आरपीआय बँका आणि एटीएमसाठी अधिकची रोख रक्कम ठेवते. या चोरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत बंदुकधारी चोर बँक कर्मचाऱ्यांना घेऊन जाताना दिसत आहेत. चोरांनी बँकेचे सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृहात कैद केलं. यानंतर चोरांनी बदुंकीचा धाक दाखवून बँकेच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याला तिजोरी उघडण्यास सांगितले. यानंतर चोरांनी तब्बल १८ कोटी ८० लाख रुपये लुटले.

How effective is lidar survey Taxation of constructions in Gavthan and CIDCO colonies as before
‘लिडार’ कितपत प्रभावी? गावठाण, सिडको वसाहतींमधील बांधकामांना पूर्वीप्रमाणेच कर आकारणी
thane property exhibition marathi news, thane property exhibition marathi news
ठाण्यात ४० लाखांपासून ते ४ कोटी रुपयांच्या घरांचे पर्याय, ठाणे मालमत्ता प्रदर्शनात आभासी पद्धतीने हेलिकाॅप्टर सैर
women tehsildars car chased by bikers in jalgaon
चित्रपटाप्रमाणे थरार… जेव्हा महिला तहसीलदारांच्या वाहनाचा दुचाकीस्वारांकडून पाठलाग होतो
pune Protest FTII Hindutva organization National Cinema Museum I am Not the River Jhelum Screening
पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारात हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन : ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : कल्याणमध्ये व्यावसायिकाने केली पत्नीसह मुलाची हत्या; उशीने तोंड दाबून हत्या केल्याचे तपासात समोर,हत्या करून व्यावसायिक फरार

पींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू

या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तपास यंत्रणा बँकेतील सीसीटीव्हाचा तपास करत आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Masked armed robbers loot over 18 crore rs from psu bank in manipur pbs

First published on: 02-12-2023 at 14:18 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×