अमेरिकेमधील इलिनॉय राज्यातील डुपो शहरामध्ये इंधन वाहून नेणाऱ्या ट्रेनचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर रेल्वेच्या डब्ब्यांमधील इंधनाने पेट घेतल्याने घटनास्थळी आगेचे मोठे लोळ उठल्याचे दिसून आहे. अनेक किलोमीटर दूरवरुन आगीच्या ज्वाला दिसत होत्या. सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण शहराचा विजपुरवठा खंडित करण्यात आला असून स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंधन घेऊन जाणाऱ्या युनियन पॅसिफिक ट्रेनचा स्थानिक वेळेनुसार दुपारी पाऊणच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रेनचे १६ डब्बे रुळावरुन घसरले. या डब्ब्यांमध्ये मिथाइल आयसोब्यूटिल केटोन हे ज्वलनशील इंधन असल्याने डब्ब्यांनी आग पकडली. या इंधनामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये १२ डब्यांना भीषण आग लागली. एवढ्या मोठ्या दूर्घटनेमधून सर्वजण सुखरुप बचावले आहेत. रेल्वे कर्मचारी तसेच रेल्वे मार्गाजवळील लोकांना वेळीच सुरक्षीत स्थळी हलवल्याने कोणीही जखमी झाले नाही.

अग्निशामन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या प्रदेशातील तापमान अधिक असल्याने आणि आग लागलेला भाग बराच मोठा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive blaze as train carrying flammable liquid derails in illinois scsg
First published on: 11-09-2019 at 14:07 IST