नवी दिल्ली : काँग्रेसने सोमवारी खाकी चड्डीला आग लागल्याचे छायाचित्र ‘ट्वीट’ केल्यानंतर भाजपने त्यास आक्षेप घेत काँग्रेस हिंसाचारास खतपाणी घालत असल्याचा आरोप केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशाचा एके काळी भाग असलेला पट्टा आणि खाकी चड्डी या छायाचित्रात असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. सध्या संघ स्वयंसेवकांच्या गणवेशात खाकी फुल पँटचा समावेश केला आहे.

खाकी चड्डीला आग लागलेली या छायाचित्रात दाखवले आहे व त्याबरोबर काँग्रेसने लिहिले आहे, की द्वेषाच्या बेडय़ांतून देशाला मुक्त करायचे आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे केल्या गेलेल्या नुकसानाची भरपाई करायची आहे. एक -एक पाऊल टाकत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. सध्या सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या लोगोचा वापर करून ‘१४५ दिवस बाकी’ असे नमूद केले आहे. याबाबत काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना भाजपने आरोप केला की, काँग्रेस हिंसाचारास उत्तेजन देत आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, की भारताच्या संवैधानिक व्यवस्थेत हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. काँग्रेसचे आगीशी जुने नाते आहे. त्यांनी सत्तेवर असताना पंजाबला आगीत ढकलले व १९८४ मध्ये शिखांना जिवंत जाळण्यामागे ते जबाबदार होते. काँग्रेसने केरळमधील ‘दहशतवाद्यां’ना संघाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचे संकेत या ‘ट्वीट’द्वारे दिले आहेत. काँग्रेसने हे ‘ट्वीट’ त्वरित हटवावे.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
sangli congress, congress leaders sangli latest marathi news
सांगलीत काँग्रेसचे भवितव्य काय ? विधानसभेत फटका बसण्याची नेत्यांना भीती
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला