गेल्या काही काळात सीमावाद किंवा चिनी उत्पादनांची भारतीय बाजारपेठेतील वाढती घुसखोरी यासारख्या मुद्द्यांमुळे दोन्ही देशांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण आहे. मात्र, या दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करायचे ठरवल्यास चमत्कार पाहायला मिळू शकतो, याचा प्रत्यय नुकताच आला. भारत आणि चीन यांनी मिळून ‘मित्रा’ हा अद्ययावत रोबोट तयार केला. बंगळुरूमधील इन्व्हेन्टो या कंपनीने या रोबोटचे डिझाईन आणि सॉफ्टवेअर विकसित केले. मात्र, चीनमध्ये उपलब्ध असणाऱ्या उच्चप्रतीच्या हार्डवेअर्सचे महत्त्व लक्षात घेता या रोबोटची बांधणी चीनमध्ये करण्यात आली. चीनमधील शेनझेन आणि डाँगुआन येथील कारखान्यात या रोबोटला मूर्त स्वरूप देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅनरा बँकेच्या बंगळुरू येथील शाखेत ‘मित्रा’ हा नावाचा हा रोबोट सध्या प्रायोगिक तत्त्वावर काम करत आहे. लवकरच भारतातील रुग्णालये आणि चित्रपचगृहांमध्येही ‘मित्रा’ पाहायला मिळेल. हा रोबोट रूग्णांचे स्वागत करणे, त्यांची वैद्यकीय पार्श्वभूमी सांगणे, अशी कामे करू शकतो. तर चित्रपटगृहात आलेल्या प्रेक्षकांना त्यांनी पूर्वी बघितलेल्या चित्रपटांच्याआधारे कोणता चित्रपट बघायचा, यासाठी हा रोबोट सल्ला देऊ शकतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet mitra the robot designed by bengaluru firm and made in china
First published on: 20-09-2017 at 18:12 IST