गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे(भाजप) प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी हे भाजपच्या पदाधिकाऱयांना धडे देणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत, दिल्लीत भाजपच्या देशव्यापी पदाधिकाऱयांची बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीसुद्धा उपस्थित आहेत.
नवी दिल्लीत भाजपची ही बैठक दिवसभर चालणार आहे. या बैठकीत मोदी निवडणुकीसाठी बनविण्यात आलेल्या विविध समित्यांचाही आढावा घेणार असल्याचे समजते. त्याचबरोबर निवडणुक प्रचाराच्या मुख्यमुद्दयांवर भाजर पदाधिकाऱ्यांना मोदी संबोधित करणार आहेत.
या बैठकीत पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह, लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते अरुण जेटली यांच्यासह भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत.