२०१६-१७ आर्थिक वर्षात केंद्रीय गृह मंत्रालयासाठी ७७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी मोठा निधी हा सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यासाठीच देण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत पुढील आर्थिक वर्षांसाठीच्या तरतुदी २४.५६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयासाठी ७७३८३.१२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी ६७४०८.१२ कोटी हे अनियोजित खर्च असून, ९९७५ कोटी रुपये नियोजित खर्च असणार आहे. एकूण तरतुदीपैकी ५०१७६.४५ कोटी रुपये सात निमलष्करी दलांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक १६२२८ कोटी रुपये केंद्रीय राखीव पोलीस दलाला मिळणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Feb 2016 रोजी प्रकाशित
अंतर्गत सुरक्षिततेसाठी अर्थसंकल्पात ७७००० कोटी
सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यासाठी जास्त निधी
Written by वृत्तसंस्था

First published on: 29-02-2016 at 17:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mha gets rs 77383 12 cr in 2016 17 budget a 24 56 pc hike