जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले आहे. ते कर्करोगाने ग्रस्त होते. अॅलन यांनी आपले बालपणीचे मित्र बिल गेट्स यांच्यासह मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अॅलन यांची कंपनी व्हल्कन इंकने याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. अॅलन यांचे सोमवारी निधन झाले. अॅलन यांना यापूर्वी २००९ मध्ये कर्करोगाचे (एनएच लिम्फोमा) निदान झाले होते. तो पुन्हा उद्धवल्याचे अॅलन यांनी याच महिन्यात म्हटले होते.

क्रीडा प्रकारात अधिक रस असलेले अॅलन हे पोर्टलँड ट्रेल ब्लेजर्स आणि सिएटल सिहॉक्सचे प्रमुख होते. अॅलन आणि बिल गेट्स यांनी १९७५ मध्ये मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. मायक्रोसॉफ्टसाठी १९८० हे वर्ष मैलाचा दगड ठरले होते. त्यावेळी आयबीएम कंपनीने पर्सनल कॉम्प्युटर क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आयबीएमने मायक्रोसॉफ्टकडून पर्सनल कॉम्प्युटरसाठी ऑपरेटिंग सिस्टिम पुरवण्याचे काम दिले होते.

या निर्णयामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनी तंत्रज्ञानात जगात अव्वल स्थानी पोहोचली. अॅलन आणि गेट्स हे दोघेही अब्जाधीश बनले. त्यानंतर दोघांनीही समाजकार्याला वाहून घेतले. त्यांनी अनेक स्वयंसेवी संस्था स्थापन करुन जगभरात विविध विकासकामांना निधी पुरवला. अॅलन यांनी बेघर लोक, अडव्हान्स सायंटिफिक रिसर्चसारख्या क्षेत्राला मागील दोन दशकांत २ अब्ज डॉलरची मदत केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft co founder paul allen dies at
First published on: 16-10-2018 at 08:33 IST