धक्कादायक ! छेडछाडीला विरोध करणाऱ्या अल्पवयीन तरुणीला पेटवलं

पीडित तरुणी दहावीत शिकत असून आरोपींकडून वारंवार तिची छेड काढली जात असे

मेरठमधील सरधना येथे एका अल्पवयीन तरुणीला पेटवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी दहावीत शिकत असून आरोपींकडून वारंवार तिची छेड काढली जात असे. आरोपींना तरुणीच्या नातेवाईकांना यासंबंधी जाब विचारला होता. ज्याचा राग मनात धरत आरोपींनी गुरुवारी तरुणीच्या घरात घुसखोरी करत आधी मारहाण केली, आणि नंतर केरोसिन टाकून पेटवलं. तरुणी सध्या गंभीर असून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली असून सर्वांचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय तरुणी अभ्यासासाठी जात असताना त्याच परिसरात राहणारे काही तरुण तिची छेड काढत अश्लील चाळे करायचे. तरुणीने नातेवाईकांकडे यासंबंधी तक्रार केली होती. गुरुवारी आरोपींनी पीडित तरुणीकडे जबरदस्ती मोबाइल देत जर रात्री फोनवर बोलली नाहीस तर गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली होती. आरोपींनी व्हिडीओ तयार करुन व्हायरल करण्याचीही धमकी दिली होती. तरुणीने आपल्या नातेवाईंकांना ही माहिती दिली.

पीडित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजता आरोपींनी फोन केला होता. मी त्यांनी पुन्हा तसं न करण्याचा सल्ला दिला होता. यानंतरही त्यांनी ऐकलं नाही तेव्हा मात्र मी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांकडे तक्रार केली.

शुक्रवारी रात्री १० वाजता आरोपी पीडित तरुणीच्या घरात घुसले आणि धमकावण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी केरोसिन अंगावर टाकून तरुणीला जाळलं. आरडाओरडा ऐकून सर्व शेजारी धावत आले, मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले. तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Minor girl burned in meerut