Modi-Putin Hug In China Ahead Of SCO Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत भाषण करणार आहेत. या पार्श्वभूमी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनही या शिखर परिषदेसाठी उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गळाभेट घेतल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या या गळाभेटीची फोट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान एससीओ शिखर परिषदेचे अनेक फोटो समोर आले आहेत, त्या फोटोंमध्ये मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकत्र दिसत आहेत. यानंतर या फोटोंमधून मोठे अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादले आहे. असे असूनही भारताने रशियन तेलाची खरेदी थांबवलेली नाही. याचबरोब आज मोदी आणि यांची गळाभेट भारत आणि रशियातील भक्कम संबंध अधेरेखित करते.

आज एससीओ शिखर परिषदेची एक महत्त्वाची बैठक होत आहे. अनेक मोठे देश त्यात सहभागी झाले आहेत. यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणांना कसे सामोरे जायचे यावरही विचारमंथन सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी आज राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचीही भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबतही चर्चा केल्याची शक्यता असून, अनेक मुद्द्यांवर एकमत होईल असे मानले जात आहे.

रविवारी पंतप्रधान मोदींची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय बैठक झाली. अनेक वर्षांनंतर झालेल्या या बैठकीत भारत-चीन संबंधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. दोन्ही नेत्यांनी परस्पर भागीदारीचे महत्त्व समजून घेतले आणि भविष्यात सहकार्य वाढवण्याबद्दल चर्चा केली.

शिखर परिषदेदरम्यान, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की, चीन प्रादेशिक सुरक्षेला नवीन उंचीवर नेण्यासाठी सर्व देशांसोबत एकत्र काम करेल. या शिखर परिषदेने आंतरराष्ट्रीय संबंधांना एक नवीन दिशा दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.