देशाचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी आठवड्यात पहिल्यांदाच भारतीय संरक्षण दलाचा दौरा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान भारतीय नौदलातील अत्याधुनिक युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’ला भेट देतील. यानिमित्ताने अत्याधुनिक लष्करी सामर्थ्याने सज्ज असलेल्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ युद्धनौकेच्या सामर्थ्याचे पहिल्यांदाच प्रदर्शन करण्यात येईल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण दलाच्या दौऱ्यादरम्यान ‘आयएनएस विक्रमादित्य’ ला भेट देण्याचा मानस पंतप्रधानांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आगामी आठवड्यातील १४ आणि १५ जून रोजी पंतप्रधानांच्या भेटीसाठी भारतीय नौदलाने तयारी सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi to start defence tour with ins vikramaditya
First published on: 07-06-2014 at 01:08 IST