चंडीगड : पंजाबमधील मोहाली येथील चंडीगड विद्यापीठात विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह चित्रफित प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्याप्रकरणी एका विद्यार्थीनीसह तिच्या २ मित्रांना अटक करण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठ परिसरात अद्यापही विद्यार्थ्यांची निदर्शने सुरू आहेत.

विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह चित्रफित प्रसारित केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी एक विद्यार्थींनी आणि तिच्या मित्राला अटक केली आहे. तसेच, एकाला ताब्यातही घेण्यात आलं आहे. विद्यार्थिनीने आक्षेपार्ह चित्रफित आपल्या मित्राला पाठवल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विद्यार्थ्यांची तीव्र निदर्शने

पोलिसांनी तिघांना अटक केल्यानंतरही विद्यार्थी विद्यापीठ परिसरात निदर्शने करत आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या कार्यालयाला घेराव घातला आहे. तर, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

पंजाब पोलीस आणि चंडीगड विद्यापीठ चित्रफित प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर, कोणतेही चित्रफित प्रसारित झाले नाही. अथवा कोणीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

एका विद्यार्थीनीची चित्रफित प्रसारित

एका विद्यार्थीनीने अन्य हॉस्टेलमधील मुलींचे चित्रफित रेकॉर्ड करून प्रसारित केले, असा आरोप करण्यात येत होता. मात्र, विद्यार्थ्यांचे हे आरोप विद्यापीठाने फेटाळले आहेत. तसेच, एकाच विद्यार्थीनीने आपलं चित्रफित तिच्या मित्राला पाठवल्याचं विद्यापीठाने सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला आयोगाने घेतली दखल

दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. विद्यार्थीनींचे आक्षेपार्ह चित्रफित प्रसारित केल्याचं प्रकरणाची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीबाबात महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पंजाब पोलिसांनी पत्रही लिहलं आहे.