Mohali Momo Factory : मोमोजचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. तेव्हा तुम्हाला मोमोज खाल्याशिवाय राहवत नाही. मोमोज अनेकदा फॅक्टरीमध्ये तयार केले जातात. पण आता मोमोजप्रेमींना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. पंजाबच्या मोहालीच्या मतौरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोमोज आणि स्प्रिंग रोल बनवणाऱ्या एका कारखान्यावर अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता फॅक्टरीच्या फ्रीजमध्ये कुत्र्याचं कापलेलं डोकं आढळून आलं आहे. या प्रकारामुळे पंजाबमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं घटना काय?

मोहालीच्या मतौरमधील एका मोमोज बनवणाऱ्या फॅक्टरीत अतिशय घाणेरड्या पद्धतीने मोमोज बनवले जात होते. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओची प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आणि मोमोज बनवणाऱ्या फॅक्टरीत छापा टाकला. अधिकाऱ्यांनी फॅक्टरीत छापा टाकला असता अधिकाऱ्यांना जे काही आढळून आलं, ते पाहून अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला.

या फॅक्टरीत अतिशय घाणेरड्या पद्धतीने हे मोमोज बनवले जात असल्याचं अधिकाऱ्यांना आढळून आलं. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी मोमोज बनवले जात होते, त्या फॅक्टरीतील फ्रीजमध्ये कुत्र्याचं कापलेलं डोकं आणि इतर प्राण्यांचं मांस आढळून आलं आहे. या सर्व प्रकाराची प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. दरम्यान, या फॅक्टरीची आता चौकशी सुरु करण्यात आली असल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

या फॅक्टरीतील काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत फॅक्टरीत अतिशय अस्वच्छता दिसून येत आहे. तसेच अनेक कोबी कुजलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. तसेच प्रशासनाने फॅक्टरीत छापा टाकला असता तेव्हा ५० किलो खराब चिकन देखील आढळून आलं आहे. हे चिकन आता प्रशासनाने जप्त करत ते नष्ट केलं आहे. तसेच ज्या ठिकाणी कुत्र्याचं डोकं आढळून आलं, पण कुत्र्याचा मृतदेह गायब होता. त्यामुळे आता याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक प्रशासन देखील सतर्क झालं आहे. त्यामुळे या फॅक्टरीत तयार होणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांची देखील चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणात फॅक्टरीच्या मालकाविरोधाक गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, या प्रकारामुळे फॅक्टरीतील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.