जगभरात करोनाची महामारीची तिसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत तर सोमवारी करोना रूग्ण संख्येचा नवा विक्रमच प्रस्थापित झाला. सोमवारी दिवसभरात अमेरिकेत तब्बल १० लाक नागरिक करोनाबाधित आढळून आले. सध्या अमेरिकेत करोनाबरोबरच ओमायक्रॉनची त्सुनामी आलीचे दिसत असून, येथील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम होत आहे.

अत्यंत वेगाने पसरणाऱ्या व्हेरिएंटमुळे सध्या अमेरिकेत विक्रमी संख्येत रूग्ण आढळून येत आहेत. ही संख्या अन्य देशांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे. दोन वर्षांपूर्वी महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत नोंदवला गेलेला हा एक उच्चांक आहे. सोमवारी अमेरिकेत आढळलेली रूग्ण संख्या ही केवळ चार दिवसांपूर्वी आढळलेल्या रूग्ण संख्येच्या दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. चार दिवसांपूर्वी अमेरिकेत ५ लाख ९० हजारांच्या आसपास रूग्ण आढळल्याचे समोर आले होते.

सोमवारी अमेरिकेतील दैनंदिन प्रकरणांची संख्या इतर कोणत्याही देशात पाहिल्या गेलेल्या संख्येपेक्षा दुप्पट होती. भारतातील डेल्टा वाढीदरम्यान यूएस बाहेर सर्वाधिक संख्या आली, जेव्हा ७ मे २०२१ रोजी ४१४००० हून अधिक रूग्ण आढळून आले. तसेच, सध्या वाढत्या संसर्गामुळे विमानाची उड्डाणे रद्द झाली आहेत, शाळा आणि कार्यालये बंद आहेत, रूग्णालयांवरील भार वाढला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवढच नाही तर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांचे संपूर्ण लसीकरण होऊन त्यांनी बुस्टर डोस देखील घेतलेला आहे. असे असतानाही त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.