मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1. Loksabha Voting : मोदींनी केले मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (मंगळवारी) राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींने आपला मतदानाचा हक्क बजावला. वाचा सविस्तर..

2. भाजपच पहिल्या क्रमांकावर राहील!

लक्ष्यभेदी हल्ला, बालाकोटवरील हवाई हल्ले या राष्ट्रवादाच्या मुद्दय़ांच्या नंतर सर्वाधिक प्रतिसाद हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरील टीकेला मिळतो. त्यांच्या सत्ताकाळातील कारभाराबाबतची नाराजी अजूनही असल्याचे त्यातून दिसून येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत केले. वाचा सविस्तर..

3. गौतम गंभीर यांची नवी इनिंग, भाजपाकडून पूर्व दिल्लीतून लढणार

क्रिकेटकडून राजकारणाच्या पीचकडे वळलेले भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. वाचा सविस्तर..

4. भारताने इराणकडून तेल आयात करू नये -अमेरिका

निर्बंधांचा मान राखून भारताने इराणकडून तेल आयात करू नये असे अमेरिकेने म्हटले आहे. भारत व चीनसह इतर पाच देशांना अमेरिकेने इराणकडून तेल आयातीवर बंदी घालण्यास सांगितले असून अणुकरारातून एक वर्षांपूर्वी बाहेर पडल्यानंतर अमेरिकेने इराणवर कडक निर्बंध लागू केले होते. वाचा सविस्तर..

5. कोल्हापूरच्या राजकारणाचा नवा त्रिकोण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकारणाचा कॅलिडोस्कोप कसा बदलेल आणि कोणता रंग धारण करेल याची शाश्वती देता येत नाही. असेच काहीसे कोल्हापूर जिल्ह्यत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर..