१. राम नव्हे ‘हराम’ कदम, विकृत भाजपाला उखडून फेका-शिवसेना

राम कदम यांच्या बेताल वक्तव्यावर शिवसेनेने आता कडाडून टीका करत त्यांच्या वक्तव्याचा आणि भाजपाच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा समाचार घेतला आहे. तसेच राम कदम यांचा उल्लेख हराम कदम असा करत त्यांच्यावर टीकेचे ताशेरे झाडले आहेत. एवढेच नाही तर बेताल वक्तव्य करणाऱ्या या हराम कदमांविरोधात भाजपाचाही एकही तोंडाळ पुढारी का बोलत नाही असाही प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. भाजपा विकृतीमुळे महाराष्ट्र धर्म बुडाला आहे ही विकृती उखडून फेका असे आवाहनही शिवसेनेने केले आहे. वाचा सविस्तर 

२. इंधनाचा भडका, पेट्रोल, डिझेल महागले

इंधनाच्या दरात सातत्याने वाढ सुरुच असून शुक्रवारी पेट्रोल प्रति लिटरमागे ४८ पैसे आणि डिझेल प्रति लिटरमागे ५५ पैशांनी महागले. मुंबईत एक लिटर पेट्रोलचे दर ८७. ३९ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर एक लिटर डिझेलचे दर ७६. ५१ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. वाचा सविस्तर

३. घरचं राजकारण मी सांभाळू शकले नाही, आशाताईंचा लतादीदींना टोला!

‘मला माझ्या घरातले राजकारण सांभाळता आले नाही’ असे म्हणत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी लतादीदींना टोला लगावला आहे. आशा भोसले मुंबईतील दीनानाथ नाट्यगृहात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी आशा भोसले यांची मुलाखत घेतली. वाचा सविस्तर

४. हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचे निधन

हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचे हृदयविकाराच्या झटक्याने फ्लोरिडा येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. डॅन ऑगस्ट आणि गन स्मोकसारख्या अनेक टीव्ही शोमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. तर १९९७ मध्ये बुगी नाइट्स या सिनेमासाठी ऑस्कर नामांकन मिळाले होते. इव्हिनिंग शेड्स या सिनेमातील भूमिकेसाठी बर्ट रेनॉल्ड्स यांना गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वाचा सविस्तर

५. यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही- चंद्रकांत पाटील</strong>

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे राजकीय वर्तुळाला धक्का दिला. कोल्हापूर पोलीस दलातर्फे दिला जाणाऱ्या गणराया अ‍ॅवॉर्डचे वितरण तसेच जिल्ह्यतील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य व शासकीय विभागाचे अधिकारी यांची संयुक्त समन्वय बैठक आज महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाटय़गृह येथे आयोजित केली होती. वाचा सविस्तर